Babasaheb Ambedkar Jayanti Quotes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार, भारतीय समाजाला दिशा देणारी अनमोल सुविचार

बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे विचार जगभर पोहोचत आहेत.

Babasaheb Ambedkar Jayanti Quotes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार, भारतीय समाजाला दिशा देणारी अनमोल सुविचार
बाबासाहेब आंबेडकर फोटो

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ शब्दांचा संग्रह नसून, ती विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा आहे. 14 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना, त्यांचे विचार पुन्हा एकदा समाजमनात नवचैतन्य फुंकत आहेत. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक समता या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ बौद्धिक प्रगतीवरच नव्हे, तर चारित्र्य संवर्धनावरही विशेष भर दिला. त्यांच्या मते, विद्वानापेक्षा चारित्र्यवान व्यक्ती समाजासाठी अधिक उपयुक्त असते. "बुद्धीचा विकास करणे हे मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे," असे सांगतानाच त्यांनी नीतिमत्तेची जोड देण्याचे आवाहन केले.

बाबासाहेबांचे अनमोल विचार

"माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा."

babasaheb ambedkar png

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा."

Babasaheb Ambedkar Jayanti Quotes

"मी अशा धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो."

बाबासाहेब आंबेडकर फोटो hd

"बुद्धिमत्तेचा विकास हेच मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे."

डॉ बाबासाहेब आंबेडकर फोटो

बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे विचार जगभर पोहोचत आहेत. जातीवाद, विषमता आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांची ही 'विचारज्योत' आजही कोट्यवधी लोकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या विचारांमुळेच आधुनिक भारताची पायाभरणी मजबूत झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2026 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).