महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. यावर आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील भाष्य केले आहे. राज्याच शासकीय हॉस्पिटल मध्ये कोविड काळात जे कर्मचारी, डीन, डॉक्टर होते तेच आजही काम करत आहेत मग आरोग्य यंत्रणेची ही अशी अवस्था कशी असू शकते? आता एक फूल दोन हाफ कुठे आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असते की रूग्णालयात बळी का जात आहेत? आता याची चौकशी सीबीआय कडून व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात ड्रोनने सुद्धा औषध पुरवठा केला गेला होता. कोविड मध्ये लसीकरण झालं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित झाला. योध्यासारखे हे सगळे लढले त्या आरोग्य यंत्रणेला बदनाम केलं जाताय याला जबाबदार कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Mumbai: On the hospital deaths case, former CM Uddhav Thackeray says, "...During COVID-19, the same doctors, deans, nurses, and ward boys were there... They served the patients by risking their lives. As per my knowledge, Maharashtra was the only state where medicines were… pic.twitter.com/FBnIzNvM6G
— ANI (@ANI) October 6, 2023
सरकारला गोवा, गुवाहाटी, सुरतला फिरायला पैसे आहेत पण आरोग्य यंत्रणेसाठी पैसे नाहीत. फक्त नांदेडच्या डीनवरच गुन्हा का दाखल केला? कळवा, संभाजीनगरला तेच झालं तिथे गुन्हा दाखल का झाला नाही ? हा सवाल देखील विचारला आहे. Nagpur मध्ये मेयो-मेडिकल रूग्णलयांमध्ये 24 तासांत दगावले 25 रूग्ण; नांदेड, औरंगाबाद नंतर राज्याच्या उपराजधानीतही स्थिती चिंताजनक.
साथ नसताना मनुष्यबळ कसा कमी पडत . डॉक्टरांच्या बद्दलयासाठी पदासाठी रेट कार्ड ठरलाय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शासकीय रूग्णालयांमध्ये जाऊन डीन सोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.