दिलीप वळसे पाटील । PC: Twitter/ANI

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील त्यांच्या जाहीर भाषणामध्ये मशिदीमधील भोंगे उतरवले नाही तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी संघर्षाचे प्रसंग पहायला मिळाले. मात्र अशातच काल राज्याचे गृहमंत्री मात्र शिरूर मध्ये असताना एका भाषणादरम्यान अजान सुरू होताच बोलता बोलता थांबल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयामध्ये दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या या कृत्याचा व्हिडिओ देखील शेअर केला जात आहे.

एका जाहीर सभेत दिलीप वळसे पाटील उपस्थितांना संबोधित करत होते. अशावेळी अजानचा आवाज सुरू झाला आणि दिलीप वळसे पाटीलांनी बोलणं थांबवलं. हातानेच थांबा असा इशारा देखील त्यांनी केला. अजान सुरू असताना ते माईकसमोरच उभे असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पहा व्हिडिओ

अजानचे भोंगे लावणार्‍यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. तसेच ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण अजानच्याच वेळी लावणं योग्य नाही. अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी दिलिप वळसे पाटीलांनी दिली आहे.  नक्की वाचा: Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया .

सध्या इस्लामिकधर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या काळात कुराण पठण, धार्मिक प्रार्थना पठण केले जाते.