Maharashtra Holi Guidelines: होळी, धुळवड सणांवरील निर्बंध ठाकरे सरकारकडून मागे, नव्या नियमांबाबत परीपत्रक जारी
Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

होळी आणि धुळवड सण साजरे करण्यावर लावण्यात आलेले निर्बंध (Maharashtra Holi Guidelines) महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मागे घेतले आहेत. एक परिपत्रक काढून राज्य सरकारने हे निर्बंध मागे घेतले आहेत. नव्या परिपत्रकानुसार होळी आणि धुळवडीवरील (Dhulwad Festival) सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची होळी (Holi ) आणि धुळवड निर्बंधमुक्त असणार आहे. राज्य सरकारने आगोदर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात या सणांवर अनेक निर्बंध होते. प्रामुख्याने होळी ही रात्री 10 वाजणेपूर्वीच पेटवावी. इयत्ता 10वी आण 12वी परीक्षा सुरु आहेत. त्याचे भान ठेऊन मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावर सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय विरोधी पक्ष यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्या आली होती. या नाराजीनंतर ठाकरे सरकारने नवे परीपक्षक काढून निर्बंध मागे घेतले आहेत.

राज्य सरकारच्या गृहविभागाने बुधवारी एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना राज्य सरकारची नियमावलींची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश होते. त्यामुळे विविध पोलीस स्टेशनमधून होळी आणि धुळवड सणांबाबत नियमभंग होणार नाही याची काळजी घेतली जात होती. दरम्यान, आता राज्य सरकारने हे निर्बंधच मागे घेतल्याने पोलिसांवरीलही अतिरिक्त ताण कमी होणार आहे. (हेही वाचा, Holi 2022 Beauty Tips: होळीपूर्वी आणि नंतर केसांची आणि त्वचेची काळजी घेण्याच्या अत्यावश्यक हॅक्स, जाणून द्या)

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. गर्दी झालीच तर ती कमीत कमी होईल यावर भर द्यावा. शक्य झाल्यास घरीच होळीचा सण साजरा करावा असे अवाहन राज्याच्या गृह विभगाने केले आहे. शिमगा साजरा करतानाही होळीची पालखी घरोघरी घेऊन जाण्याऐवजी ती थेट मंदिरात घेऊन जावे. दरम्यान, राज्य सरकारने सण साजरा करण्यावर असलेले वेळेचे बंधन काढून टाकल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.