Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

देशात पहिल्यांदा केरळ येथे कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्ण आढळला होता, त्यानंतर दिल्ली व त्याच्या काही दिवसानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) या विषाणूने शिरकाव केला. बघता बघता महाराष्ट्रात या महामारीने उग्र रूप धारण केले व आता देशामध्ये महाराष्ट्र राज्यात साव्रधिक कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे राज्य सरकार या विषाणूशी सामना करीत आहे, तर दुसरीकडे दिवसेंदिवस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात महाराष्ट्र सरकार व इथल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब समोर येत आहे. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्य सरकारची अथक मेहनत, वेळोवेळी योजलेल्या उपयोजना व त्याला महाराष्ट्रातील नागरिकांनी दिलेली साथ याचे हे फळ आहे.

आरोग्य मंत्रालयाने 15 राज्यांमधील कोरोना रिकव्हरी आकडेवारी जाहीर केली आहे. या 15 राज्यांमध्ये महाराष्ट्र 93,154 रुग्णसंख्येसह आघाडीवर म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे सर्वात प्रभावित राज्य महाराष्ट्र असून, शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर तर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशाचा क्रमांक लागतो. (हेही वाचा: COVID19 च्या परिस्थिती संदर्भात केंद्राकडून राज्य सरकारला कोणत्याही निधीची मदत नाही- विजय वडेट्टीवार)

ईशान्येकडील राज्यांमध्ये  त्रिपुरामधील मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण 1400 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक जण बरे झाले आहेत. त्रिपुरामध्ये आतापर्यंत केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशातील 11,881 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 3,59,859 झाली आहे. भारतात कोविड-19 चा रिकव्हरी रेट 59.52 टक्के झाला आहे. आता भारतात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे 2,26,947 आहेत.

दरम्यान, भारतातील कोविड-19 रुग्णांची संख्या 6 लाखांवर गेली आहे. जूनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या खूप वेगाने वाढली आहे