Close
Search

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: जळकोट, काकोळी सह या ग्रामपंचायतींवर मनसे ने नोंदवला विजय

अंबरनाथ मध्ये काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपची युती होती. परंतू मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत आपला झेंडा रोवला आहे

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: जळकोट, काकोळी सह या ग्रामपंचायतींवर मनसे ने नोंदवला विजय
Raj Thackeray & MNS New Flag| Photo Credits: File Photo

महाराष्ट्रामध्ये आज तब्बल 12,711 ग्रामपंचायत निकालांचा (Gram Panchayat Election Results) धुरळा उडाला आहे. दरम्यान ग्राम पंचायत निवडणूका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या असल्याने कोणता पक्ष बाजी मारतो त्यापेक्षा गावकर्‍यांचा कल काय सांगतो याकडे अनेकांचे लक्ष असते. स्थानिक आघाड्यांनी रंगाणारं राजकीय गणित आता उलगडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणूकीमध्ये राज ठाकरेंचा (Raj Thackeray)  मनसे (MNS) फारशी चमकदार कामगिरी करू शकली नसली तरीही गाव पातळ्यांवर होणार्‍या ग्राम पंचायतींमध्ये पहा काय आहे मनसेची परिस्थिती?

सकाळी 8 वाजल्यापासुन निवडणूक मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये मनसेने ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकली आहे.सोबतच रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायती मध्ये मनसेने खातं उघडलं आहे. तर उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे विजयी ठरले आहेत. Hiware Bazar Gram Panchayat: पोपटराव पवार यांचे ग्रामविकास पॅनल विजयी; 30 वर्षांनीही इतिहास बदलला नाही.

अंबरनाथ मध्ये काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपची युती होती. परंतू मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत आपला झेंडा रोवला आहे. 7 जागांच्या या निवडणुकीत मनसेने 4 जागा जिंकल्या आहेत. नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर हे विजयी ठरले आहेत.

बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर, अहमदनगर मध्ये शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायत मनसेने जिंकली आहे. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्यासाठी हा मोठा विजय आहे. कोकणातही नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजयी ठरले आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change