IAS Officers Transfers In Maharashtra: महाराष्ट्र सरकार कडून पुन्हा 7 सनदी अधिकार्‍यांची बदली; पुणे महानगर परिवहन महामंडळ, कोकण विभागीय आयुक्तपदी खांदेपालट
Maharashtra Government | (File Image)

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राज्यातील आयएएस ऑफिसर्सची बदली करण्यात आली आहे. 10 दिवसांपूर्वीच म्हणजे 30 जूनला राज्यातील 7 आयएएस ऑफिसर्स बदलण्यात आले होते त्यामध्ये प्रवीण परदेशी यांचे देखील नावं होतं. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा नवी यादी प्रसिद्ध करत 7 सनदी अधिकार्‍यांना बदली केले आहे. या नव्या बदलीमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड साठी नवे व्यवस्थापकीय संचालक देण्यात आले आहेत. 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावरून दूर करून त्यांच्यावर पीएमपीएमएलची जबाबदारी देण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये लक्ष्मीनारायण मिश्रा, व्ही. बी. पाटील,विजय वाघमारे,विमला आर, डॉ. राजेंद्र भारूड, जलाज शर्मा, मनिषा खत्री या सात जणांची नावं आहेत. व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे शासकीय आदेश काल जारी करण्यात आली आहे. नक्की वाचा: Praveen Pardeshi यांच्यासह 7 IAS Officers ची महाराष्ट्र राज्य सरकार कडून बदली.

विजय वाघमारे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव पदी नियुक्त झाले आहेत. विमला आर नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी विराजमान झाल्या आहेत. डॉ. राजेंद्र भारूड पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदावर आले आहेत. तर जलाज शर्मा धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदावर आले आहेत. मनिषा खत्री नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आल्या आहेत.