Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo: Facebook)

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) लोक बेजबाबदारीने वागत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या (State Government) आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहेत. तसेच काही नागरिक भाजीपाला व इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी  अनेक ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा धोका अधिक वाढू लागला आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लाकडाऊन काळात मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) येथील नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पुण्यातील नागरिक जबाबदारीने वागत नाहीत, म्हणून त्यांना मिळाणाऱ्या सवलती रद्द करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहेत. तसेच राज्यातील उर्वरित भागांना अंशत: सवलत मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. राज्यातील नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी गर्दी जमवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत आहेत. मात्र, अनेकजण राज्य सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे येथील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात मिळणाऱ्या सुविधा रद्द केल्या आहेत. लॉकडाउन संदर्भात राज्य शासनाने 17  एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली  आहे. मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असणार आहे. म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17 एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील. हे देखील वाचा- राज्य सरकारची मोठी घोषणा; कोरोना चाचणीसाठी राज्यात आणखी 32 प्रयोगशाळांची उभारणार केली जाणार

ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात लॉकडाऊन असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.