Ashadhi Wari 2022: आषाढी वारीच्या मार्गावर महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी सरकार देणार खास सुविधा
Pandharpur Wari | File Image)

महाराष्ट्रात यंदा तब्बल दोन वर्षांनी आषाढी वारी (Ashadhi Wari) पायी पार पडणार आहे. या वारीसाठी तयारीला सुरूवात झाली आहे. प्रशासकीय पातळीवर देखील वारकर्‍यांच्या सोयीसाठी विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. वारीत महिलांचाही मोठा सहभाग असतो. त्यांच्या सोयीसाठी आणि वैयक्तित स्वच्छता आणि सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने नवे निर्देश दिले आहेत.

महिल्या आयोगाच्या निर्देशानुसार वारीत दर 10-20 किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी शौचालय आणि आंघोळीसाठी व्यवस्था केली जाणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन लावली जाणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबतचे पत्रक पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. Ashadhi Wari Sant Tukaram Palkhi 2022: संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा गोल रिंगण, उभं रिंगणाच्या तारखा.

यंदा आषाढी एकादशी 10 जुलै दिवशी आहे. त्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 21 जूनला संध्याकाळी 4 वाजता प्रस्थान ठेवणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला ठेवणार प्रस्थान ठेवणार आहे.