Maratha Reservation :  मराठा समाजाला 16% आरक्षण,  कृती समितीचा अहवाल
विधानमंडळ Photo Credit : File Image

Maratha Reservation :  मराठा समाज गेली 3 वर्ष विविध लढ्याच्या माध्यमातून आरक्षणाची (Maratha Community Reservation) मागणी करत होते. आज विधिमंडळात  कृती अहवाल सादर (Action Taken Report) करण्यात आला आहे. त्याचे दुपारी विधेयक मांडले जाणार आहे. अहवालात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण  ( Maratha quota) मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय या अंतर्गत मराठा समाजाला सरकार 16% आरक्षण देणार आहे.

आज दुपारी मांडण्यात येणार्‍या मराठा आरक्षणाच्या विधेयकामध्ये  सराकार 16% आरक्षण देऊ शकतं.  आज दुपारी विधानसभेमध्ये चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यावर सरकार काय पावलं उचलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.  मराठा आरक्षण: विधेयक विधिमंडळात येण्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी भाजपची जय्यत तयारी

मागास वर्ग आयोगाच्या अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला 16  टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे कृती अहवालात सांगण्यात आलेले आहे.