राजेश टोपे (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊनचे आदेश 30 जून पर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरातर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड आणि क्वारंटाईन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान आता मुंबईतील काही खासगी रुग्णालयांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करत कारणे दाखवा नोटिस धाडली आहे.

राज्य सरकारने महापालिका रुग्णांसह खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घ्यावे असे म्हटले होते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकरिता खासगी रुग्णालयांनी त्यांचे दर कमी करावेत असे ही सांगण्यात आले होते. परंतु मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, लिलावती आणि हिंदुजा रुग्णालयांनी COVID19 च्या रुग्णांना उपचार व दाखल करुन घेण्याच्या सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. (Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद; तर, 40 जणांचा मृत्यू)

तर सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही रुग्णालयांना भेट देत तेथे सरकारच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे की नाही ते पाहिले. परंतु नियमांची योग्य अंंमलबाजवणी करण्यात येत नसल्याचे दिसून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (पुणे: तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु) 

दरम्यान, कोरोनाचे महासंकट दूर करण्यासाठी विविध नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर खासगी दवाखाने आणि नर्सरीसुद्धा नॉन-कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात यावीत असे आवाहन करण्यात आले होते. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्याल कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 70 हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.