Lockdown (Photo Credits: PTI)

COVID-19 Restrictions in Maharashtra: कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता. परंतु, आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात येत्या 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या निर्णयाबाबत घोषणा करतील. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध यापुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वी मिनी लॉकडाऊनची घोषणा केली होती, परंतु त्याचे उल्लंघन होत असताना सरकारने 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. हे लॉकडाऊन 1 मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले. परंतु आता लॉकडाऊनमध्ये पुन्हा 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Covid Vaccine Shortage: महत्वाची बातमी! मुंबईत पुढील 3 दिवस लसीकरण बंद राहणार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात काल (28 एप्रिल) 63 हजार 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या 61 हजार 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 30 हजार 729 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.4% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.