नाणार विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

नाणार (Nanar Refinery Project) हटाव आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. आरे (Aare) येथे बुलेट ट्रेन (Bullet Train Project) कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. त्यानंतर काही तासांतच ठाकरे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच कार्यरत झाले आहेत. राज्यातील विविध मंत्रालयं, विविध विभाग, महामंडळं, विकास कामं, तातडीने करण्याची विकासकामं, राज्यातील रखडलेले प्रकल्प, हे प्रकल्प रखडण्याची कारणं यांसह राज्याची अर्थव्यवस्था आणि इतर सर्व बाबींचा तपशील उद्धव ठाकरे जाणून घेत आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या स्थितीबाबत एक श्वेतपत्रिका काढण्याचाही सरकारचा विचार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता पुढचा कोणता नवा निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, मेट्रो कारशेड प्रकल्पानंतर बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच एक विधान केले होते की, राज्यात सुरु असलेल्या प्रकल्पांची क्रमवारी विचारात घेतली जाईल. यात राज्याला आवश्यक असणारे आणि तातडीने राबावावे लागणारे प्रकल्प लवकर कसे मार्गी लागतील याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोणत्या नेत्याला मिळणार कोणता बांगला? वाचा सविस्तर)

एएनआय ट्विट

दरम्यान, विरोधकांनी मात्र सुरुवातीपासूनच राज्य सरकारवर टीका करण्याची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षाचे नेत सभागृहात आणि सभागृहाबाहेर राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे विविध निर्णयांसोबत राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संबंध येत्या काळात कसे राहतील यांबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.