महाराष्ट्र: दुष्काळग्रस्त धरण भागात कृत्रिम पाऊस पाडणार; राज्यमंत्रिमंडळात निर्णय
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाची स्थिती आहे. अशातच आगामी मान्सून काळामध्येही मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी तसेच दुष्काळाशी सामना करण्यासाठी यंदा धरण क्षेत्रामध्ये कृत्रिम पाऊस (Cloud Seeding) पाडला जाणार आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी सुमारे 30 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आज मंत्रिमंडाळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ANI Tweet

पर्जन्यवाढीसाठी Aerial Cloud Seeding चा उपक्रम राबवला जाणार आहे. यामुळे संथ झालेली मान्सून निर्माण प्रक्रिया पुन्हा विकसित करता येते. दुष्काळग्रस्त भागामध्ये अशाप्रकारच्या प्रयोगामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा मान्सूनचं आगमन लांबल्याने भारतासह महराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न भीषण होण्याची शक्यता आहे.