Ratnagiri Lote MIDC Fire: MR Pharma मध्ये  भीषण स्फोटानंतर आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Lote MIDC Fire | Photo Credits: ANI

रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यातील खेड (Khed) मध्ये लोटे एमआयडीसी मध्ये एम फार्मा (MR Pharma) कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या केमिकल कंपनीच्या आगीचं वृत्त समजताच अग्निशमक दल तात्काळ तेथे रवाना झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आणि  त्याला यश आले आहे. ANI च्या माहितीनुसार, अद्याप या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच गंभीर दुखापतीचेदेखील वृत्त नाही.

नेटवर्क 18 लोकमतच्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी (LOTE MIDC) मध्ये एम आर फार्मा केमिकल कंपनीमध्ये हे भीषण स्फोट झाले आहेत. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली असून या घटनेनंतर आजूबाजुचा परिसर काही क्षण हादरला. यामध्ये कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फूटल्या आहेत तर 10 किमी अंतरावरही धुराचे लोट पहायला मिळत आहेत.

पहा रत्नागिरीमधील या दुर्घटनेचे चित्र

मागील काही महिन्यांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोटे एमआयडीसी मध्येच या अपघाताची ही 6 वी घटना आहे. 20 मार्च दिवशी देखील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता भयंकर होती. या स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर 3 जण जखमी झाले होते.