डहाणूजवळ मालगा़डीला आग (प्रतिकात्मक प्रतिमा)

मालगाडीच्या दोन डब्यांना अचानक आग लागल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घडना डहाणूजवळी घडली. प्राप्त माहितीनुसार, या अपघाताचा फटका गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांनी बसला आहे. या गाड्या खोळंबल्या आहेत. तर, गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांचाही वेग कमालीचा मंदावला आहे. ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, डहाणू- वाणगाव या स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री उशीरा ही घटना घडली. गाडीच्या डब्यात असलेल्या प्लॅस्टिकच्या ग्रेनील मुळे ही आग झपाट्याने पसरली. पण, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने ही आग अधिक पसरली नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ओव्हरहेड वायर आणि रुळाचे मात्र, या आगीत बरेच नुकसान झाले. त्याचा परिणाम डहाणू-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प होण्यात झाला. या अपघातामुळे लाबं पल्ल्यांच्या गाड्यांना फटका बसला.

मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आग आटोक्यात आणून सर्व गाड्यांचा प्रवास सकाळी आठ ते साडेआठपर्यंत सर्व गाड्यांची वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती विभागीय रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम मार्गावरील वाहतूक अद्यापही मंद गतीनेच सुरु आहे.