Maharashtra: राज्यात येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन
CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

Maharashtra: राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यावश्यक सेवासुविधांमधील सर्वच कर्मचारी अहोरात्र काम करुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यात येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनतेने पुढे येत रक्तदान करावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.(भांडुप: मास्क न घातल्याच्या कारणास्तव विचारले असता महिलांनी क्लिनअप मार्शलच्या डोक्यात घातला पेवर ब्लॉक)

राज्यात रक्ताचा साठा कमी झाल्याने काही समस्या येत आहेत. त्यामुळे राज्यातील धार्मिक, सामाजिक संस्था आणि सोसायट्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबीराचे आयोजन करावे असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत ज्यांना स्वत:हून रक्तदान करायचे आहे त्यांनी ही जवळच्या रक्तपेढ्यांमध्ये जावे.(कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन; येथे पहा चैत्यभूमीवरील Live प्रक्षेपण)

याआधी सुद्धा गणेशोत्सवाच्या काळात सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. परंतु मुंबईसह राज्यातील विविध मंडळांनी कोरोनाची परिस्थिती पाहता रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात बोलायचे झाल्यास आज दिवसभरात 6776 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आज नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.