गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

सरकारकडून एकीकडे आरोग्ययंत्रणा कोरोना वायरसच्या दहशतीखाली अलर्ट वर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना आज राज्यातील निवासी डॉक्टर संप (Maharashtra Doctor Strike) छेडण्याच्या भूमिकेमध्ये आहे. या संपामध्ये राज्यातील 5 हजारांच्या आसपास डॉक्टर्स सहभागी आहेत. आपल्या अनेक मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी त्यांनी सरकारला शनिवारपर्यंतचा वेळ दिला होता. पण सरकारकडून प्रतिसाद न आल्याने आता डॉक्टरांनी संपाची भूमिका घेतली आहे. पण मंत्री गिरीश  महाजन (Girish Mahajan) यांनी अजून 15 दिवसांचा कालावधी मागत डॉक्टरांनी संप करू नये असं आवाहन केले आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी अद्याप आपण संपावर गेलेल्यांवर कारवाई बद्दल काही बोलत नसल्याचं म्हणत हा विषय समजूतदारीने सोडवला जाईल असं म्हटलं आहे.

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मकतेने विचार करत आहे. काही विषयांबाबत केंद्राशीदेखील बोलणी सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच हॉस्टेलच्या डागडुजीची कामं हाती घेतली जाणार आहे. असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालक यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या बैठका झाल्या. पण काहीच निष्पन्न काहीच होत नसल्याने मागण्या मान्य न झाल्याने आज पासून राज्य निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना महाराष्ट्रभर संप पुकारत आहे.