Maharashtra Din 2021 Guidelines: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसल्याने सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार सांगितले जात आहे. अशातच काल (28 एप्रिल) राज्य सरकारकडून लॉकडाऊन येत्या 15 मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आधीपासूनच नागरिकांना धार्मिक सणउत्सव, लग्नसमारंभ सारख्या गोष्टी अत्यंत साधेपणाने आणि नियमांचे पालन करत पार पाडव्या अशा सुचना दिल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर येत्या 1 मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिना निमित्त सुद्धा सरकारकडून गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.(Lockdown In Goa: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान लॉकडाऊन; मुख्यमंत्री Pramod Sawant यांची घोषणा)
यंदाचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मुख्यालयात एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाचेया येथे विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद यांनी ध्वजारोहणासाठी योग्य ती व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये असे ही म्हटले आहे.(Thane: मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू; सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख नुकसान भरपाई जाहीर)
त्याचसोबत ध्वजारोहणावेळी पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालय समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर, जिल्हाधिकाऱ्यांसह महत्वांच्या लोकांनी उपस्थितीत रहावे. तसेच कोणत्याही कवायती किंवा संचलन करण्यात येऊ नये असे ही सांगण्यात आले आहे. विधीमंडळ, उच्च न्यायालय आणि अन्य संविधानिक कार्यालयात कमी जणांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पाडावे.