Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

Maharashtra State Co-operative Bank कथित घोटाळ्यामध्ये ED ने काल एक कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) निकटवर्तीयांचा साखर कारखाना सील करण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जरंडेश्वर कारखान्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आज पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री झाली आहे.

ईडीकडून गुरु कमोडिटी बाबत चौकशी सुरु आहे. त्यामध्ये कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने ही कारवाई झाली आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. ईडीला चौकशीचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी देखील CID आणि ACB ने चौकशी केली आहे पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाणार आहे. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. असे देखील यावेळेस अजित पवारांनी बोलताना म्हटलं आहे.

ANI Tweet

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीकडून खरेदी करण्यात आला आहे. या कंपनीने कारखाना जरंडेश्वार शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला. या कंपनीमध्येच ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा देखील सहभाग आहे. स्पार्क लिंग कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार व च्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे मत आहे. जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेण्यासाठी गुरू कमो़डिंटी या बेनामी कंपनीचा वापर करण्यात आला होता. या कारखान्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 700 कोटींचे कर्ज घेतल्याचेही ईडीला आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.