पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी आज पुण्यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. पण त्यासोबतच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रश्मी शुक्लांमुळे (Rashmi Shukla) संकटात आलेल्या महाविकासआघाडीचा बचाव करताना देखील दिसले. दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या आरोपांवर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सविस्तर अहवाल सादर केला आहे. विरोधकांकडून आरोपांच्या फैरी होत असताना संबंधित प्रकरणावर सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडून तो देण्यात आला आहे त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग आणि अधिकार्यांच्या बदलींबाबतचा अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवारांनी संबंधित प्रकरणातील वस्तूस्थिती सीताराम कुंटेंच्या अहवालातून समोर आली आहे आणि चौकशी करून कारवाई होईल असेही संकेत दिले आहेत.
पवारांनी यावेळी बोलताना 'पहिल्या अहवालात ज्या अधिकार्यांच्या बदलीसाठी आणि स्थानासाठी नाव घेण्यात आले आहे तशा बदल्या झालेल्या नाहीत त्यामुळे समितीकडूनच बदली झाली असावी हे स्पष्ट आहे'. असं मत मांडलं आहे. रश्मी शुक्ला या गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त होत्या आणि त्यांनी फोन टॅपिंग केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत नियमानुसार सुरूवातीला गृहमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री त्यावर सही करतात असे म्हणाले आहेत. Rajendra Patil Yadravkar On Rashmi Shukla: काय सांगता? रश्मी शुक्ला यांनी खरोखरच राजेंद्र पाटील यड्रावकर यांना फोन केला होता? जाणून घ्या सत्य.
दरम्यान काल सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे. रश्मी शुक्लांवर गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. अजित पवारांनी पत्रकारांना आणि नागरिकांना जर त्यांच्या मनात प्रश्न असेल तर प्रसिद्ध झालेला सीताराम कुंटेंचा अहवाल वाचावा असा खोचक सल्ला देखील दिला आहे.