Maharashtra Covid-19 Update: राज्यातील 'या' 7 जिल्ह्यांत कोरोनाने वाढवली चिंता; सरकारकडून सावधगिरीचा इशारा
Covid-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्यात कमी होत असलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, येणारे सण-उत्सव यामुळे सरकारने सावधगिरीचा इशारा दिला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्यो कोरोनाची रुग्णवाढ चिंताजनक आहे. यात पुणे (Pune), रत्नागिरी (Ratnagiri), सांगली (Sangli), अहमदनगर (Ahmednagar), सोलापूर (Solapur), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

आरोग्य विभागानुसार, मागील काही आठवड्यांपासून सर्व जिल्ह्यांमधील पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, या आठवड्यात पुण्यात हा आकडा 6.58 टक्के आणि अहमदनगर समवेत इतर काही जिल्ह्यांमध्ये हा आकडा 5.08 टक्के इतका आहे. मुंबईत देखील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णसंख्येत टॉप 5 जिल्ह्यांमध्ये मुंबईचा समावेश आहे. त्याचबरोबर आगामी गणेशोत्सव यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

राज्यात एकूण 50,095 सक्रीय रुग्ण असून 90.61 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यातील 70 टक्क्यांहून अधिक केवळ 5 जिल्ह्यांमध्ये आहेत. यात पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबई चा समावेश आहे. (Pune: गणेशोत्सवात नवीन निर्बंध नाहीत, मात्र गर्दी झाल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार)

पुणे, अहमदनगर, सतारा, सोलापुर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असून येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात सावधगिरीचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. गणेशोत्सव काळात रुग्णवाढ अधिक होऊ शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णसंख्येत पुण्यात सर्वाधिक वाढ झाली असून 1,728 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये 781 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यांत 652 नव्या रुग्णांची भर पडली आहे. (Ganeshotsav 2021: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

कालच्या अपडेटनुसार, राज्यात 4,057 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 67 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर मुंबईमध्ये 495 नव्या रुग्णांसह 2 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.