Sharad Pawar | (Photo Credit : ANI)

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत नुकताच राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लागू करण्यासह विकेंड्सला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे. पवार यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती सुद्धा अधिक गंभीर होत चालली आहे.(महाराष्ट्र: Lockdown च्या भीतीने अनेक स्थलांतरित मजूरांनी धरली गावाकडची वाट, रेल्वे पूर्णपणे बंद होण्याच्या भीतीने घरी जाण्याची लागलीय घाई)

पुढे पवार यांनी असे ही म्हटले आहे की, राज्य सरकार, पोलीस आणि अॅडमिनिस्ट्रेटकडून राज्यातील परिस्थितीचा जवळून आढवा घेतला जात आहे. त्याचसोबत डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ सुद्धा रुग्णांना दिवसरात्र रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या परिस्थितीला सहकार्य करावे असे आवाहन पवार यांनी केले आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छता पाळा या गोष्टी कठोरपणे पाळा. सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दी होईल अशा कोणत्याही गोष्टी करणे टाळा असे ही त्यांनी म्हटले आहे.(Break The Chain उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 च्या नियंत्रण व व्यवस्थापनासाठी जारी केल्या खास मार्गदर्शक सूचना)

Tweet:

दरम्यान, या संकटात अडचणीत आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक पातळीवर अथक परिश्रम घेण्याचा सल्लाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला जावा. त्याचसोबत राज्यात रक्ताच्या साठ्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करावे असे आवाहन केले आहे. तर आपण सर्वजण या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास सुद्ध पवार यांनी व्यक्त केला आहे.