प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Instagram)

थंडीचे दिवस आणि डिसेंबर महिना अखेर त्यामुळे पर्यटक विविध ठिकाणी जाण्याचा बेत आखतात. खासकरुन पर्यटक थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जाण्याचा आग्रह करतात. तसेच सध्याचे महाराष्ट्रातील तापमान कमी झाले असून राज्यात हुडहुडीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळेस तुम्ही फिरायला जाण्याचा बेत करत असाल तर महाराष्ट्राबाहेर जाण्याची गरजच नाहीय.

राज्यातील काही भागात तापमानाचा पारा 3 अंशापर्यंत खाली आला आहे.तर  महाबळेश्वरसारख्या  थंड हवेच्या ठिकाणी अजूनच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा येथे पर्यटकांना पहाटेच्या वेळेस दवबिंदू पाहायला मिळत आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रात  थंडी कमी प्रमाणात दिसून येत आहे. परंतु धुळ्यामध्ये पारा 3 अंशापर्यंत येऊन पोहचला आहे. जळगावात कड्याक्याच्या थंडीमुळे द्राक्षांचा बागेत शेकोटी करावी लागत आहे. सकाळी धुके पडत असल्याने द्राक्ष बागांवर बुरशी चढत चालल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे. निफाडमध्ये गुरुवारी 1.8  अंशांपर्यंत खाली गेलेला पारा आज 4 अंशावर स्थिरावलाय. तर मनमाडमध्ये किमान तापमान 8 अंशावर गेले आहे.

राज्यात वाढत्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर जाताना उबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात आज थंडीचे तापमान वाढले असून अनेक ठिकाणच्या तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली गेला आहे.

 राज्यातील आजचं तापमान 

धुळे - ३.२ अंश सेल्सिअस

निफाड - ४ अंश सेल्सिअस

नाशिक - ६.९ अंश सेल्सिअस

मनमाड - ८ अंश सेल्सिअस

अकोला - ८.५ अंश सेल्सिअस

परभणी - १० अंश सेल्सिअस

जालना - १२ अंश सेल्सिअस

बुलडाणा - १४ अंश सेल्सिअस

पुणे - १४.७ अंश सेल्सिअस

सोलापूर - १५ अंश सेल्सिअस