मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज कोविड-19 लसीचा (COVID 19 Vaccine) दुसरा डोस घेतला. 11 मार्च रोजी त्यांनी भारत बायोटेकच्या Covaxin लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 27 दिवसांनी त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.
काल शरद पवार यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी घेतला. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस AIIMS रुग्णालयात घेतला आहे. यावेळी त्यांनी पात्र असलेल्या सर्व नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे.
CMO Maharashtra Tweet:
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his second dose of COVID vaccine today.#BreakTheChain pic.twitter.com/umpIaxGMlk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2021
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीची तुडवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे लस पुरवण्याची राज्य सरकारने मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. तसंच 25 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास मान्यता देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
दरम्यान, लस घेतल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. तसंच सध्याची कोरोना स्थिती लक्षात घेता स्वयंशिस्त पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.