Uddhav Thackeray Live: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन वाढवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1:30 वाजता जनतेला संबोधित करणार
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात मागील काही काळात विविध व्यवसाय, उद्योगांना, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा कामानिमित्त बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना आर्थिक चक्र थांबून राहू नये यासाठी मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) सुद्धा आरंभण्यात आले होते. मात्र आता मागील काही दिवसांपासून राज्यात सतत पाच हजाराच्या मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह सेशन मधून योग्य ती माहिती मिळू शकेल. उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. CMO Maharashtra च्या फेसबुक तसेच ट्विटर पेजच्या माध्यमातून तुम्ही हे संबोधन पाहू शकाल.

महाराष्ट्रात मुंबई प्रमाणेच अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. नवी मुंबई भागात याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आठवडाभराचे लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे, तर कल्याण- डोंबिवली भागात सुद्धा कंटेनमेंट झोन मध्ये लॉक डाऊन पुन्हा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. अशावेळी उद्धव ठाकरे आज नेमकी काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणुन घ्या

दरम्यान, मुंबई, पुण्यासह राज्यात आजपासून सलून्स, पार्लरच्या व्यवसायला सुद्धा सुरु करण्यात आले आहे. राज्यातील जिम ना सुद्धा लवकरच परवानगी दिली जाईल तर धार्मिक कार्यक्रमाच्या बाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही असे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री अस्लाम शेख यांनी सांगितले होते. येत्या काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी भान राखावे तसेच परंपरेसाठी मंडळांनी गणपतीच्या छोट्या मूर्ती आणाव्यात असे ठाकरे यांनी सांगितले होते. दहीहंडी उत्सव, तसेच 1 जुलैचा आषाढी एकादशीचा उत्सव मात्र अगोदरच रद्द करण्यात आला आहे.