CM Uddhav Thackeray | (Photo Credits-Twitter)

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि मराठीमध्ये बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणारे रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांचे आज निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी साहित्य विश्वासह, कलाकार आणि राजकारणी क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले.त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. अशी भावना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन; कोव्हिड 19 चाचणी आली होती पॉझिटीव्ह

दरम्यान रत्नाकर मतकरी यांचं 'अलबत्या गलबत्या' नाटक मराठी रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे. यासोबत 'आरण्यक', ‘निजधाम’ ‘खेकडा’या कलाकृतींनी रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले.त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' आज निखळले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली  

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट 

सुप्रिया सुळे ट्वीट

रत्नाकर मतकरी यांची सांहित्य संपदाही मोठी आहे. त्यांनी आपल्या एकूण आयुष्यात मोठ्यांसाठी सुमारे 70 आणि मुलांसाठी 22 नाटकं लिहिली. 20 एकांकिका, 3 कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह लिहिले आहेत. यासोबतच ‘माझे रंगप्रयोग’हा त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथही बराच गाजला.