लता मंगेशकर व उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी, भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घेतली. लतादीदींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. 11 नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना श्वास घेण्यात त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी सांगितले.

लता मंगेशकर यांच्या टीमनेही त्यांच्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन जारी केले होते. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही म्हटले आहे. वृत्तसंस्था एएनआयवर जारी केलेल्या या निवेदनात अफवा पसरवू नका असेही म्हटले होते. ठाकरे व मंगेशकर कुटुंबियांचे फार पूर्वीपासून जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. (हेही वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांची कॅंडी ब्रीच रुग्णालयात जाऊन घेतली भेट)

दरम्यान, राज ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी लता दीदींची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतरही राज ठाकरे फोन वरून तसेच प्रत्येक्ष भेटून लता दीदींच्या तब्येतीचा आढावा घेत आहेत. चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनीही काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात, गायिका लता मंगेशकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून, दीदींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली. मधुर यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘रुग्णालयात जाऊन मी लता मंगेशकर यांची भेट घेतली. हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.