कृपाशंकर सिंग यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला पोहचले देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे; राजकीय चर्चांना उधाण
Kripashankar Singh's Residence (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. सामान्यांसह सेलिब्रिटी आणि राजकारणीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढत एकमेकांकडे गणेशोत्सवानिमित्त भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. आज महाराष्ट्राचे पूर्व मंत्री आणि कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभूमीवर कॉंग्रेस, एनसीपीमधून अनेक राजकीय नेते युतीमध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये आता कृपाशंकर सिंह यांचादेखील नंबर लागणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावून गेला.

कृपाशंकर सिंग यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी आज ( 3 सप्टेंबर) उद्धव ठाकरेआणि रश्मी ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. बाप्पाचे दर्शन घेतले. युतीच्या दोन बड्या नेत्यांनी आज कृपाशंकर सिंहांची भेट घेतल्याने त्यांचा युतीमध्ये समावेश होतोय की काय? अशा चर्चा रंगल्या आहे. मात्र कृपाशंकर सिंह यांनी या सार्‍या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच सध्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ता केवळ अफवा आहेत. आता कॉंग्रेसमध्ये आहे पण भविष्यात काय होईल हे ठाऊक नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे. Ganesh chaturthi 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

ANI Tweet 

सध्या कॉंग्रेसमधून अनेक दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये नारायण राणे यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगल्या नाहीत तरच नवल! पण कृपाशंकर सिंह यांनी ही भेट केवळ गणपती दर्शनासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.