Maharashtra CET 2023: MBA/MMS Entrance Exams साठी रजिस्ट्रेशन सुरू; पहा परीक्षेच्या तारखा
Office ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र कॉमन एंटरन्स टेस्ट (Maharashtra Common Entrance Test )अर्थात सीईटी (CET)  सेल कडून यंदाच्या MBA/MMS कोर्सेसच्या सीईटी 2023 च्या परीक्षा तारखा (CET 2023 Exam Dates) जाहीर करण्यात आल्या आहे. या परीक्षा 18 आणि 19 मार्च दिवशी होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेस मध्ये पुढे शिक्षण घ्यायचं आहे त्यांना प्रवेशप्रक्रियेसाठी mbacet2023.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून 4 मार्च पर्यंत चालणार आहे. हे देखील नक्की वाचा: Shocking: विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ! देशभरातील 695 विद्यापीठे आणि 34,000 हून अधिक महाविद्यालये NAAC मान्यताविना कार्यरत .

MBA/MMS Admission साठीच्या सीईटी परीक्षांसाठी कसं कराल रजिस्ट्रेशन?

  • mbacet2023.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • रजिस्ट्रेशन साठी असलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नाव, जन्म तारीख, इमेल अ‍ॅड्रेस सह महत्त्वाची माहिती भरा.
  • तुमच्या लॉगिन अ‍ॅप्लिकेशन आणि पासवर्ड सह लॉग ईन करू शकता.
  • अ‍ॅप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरा.
  • माहिती सेव्ह करून सबमीट करा. त्यानंतर फी भरा.
  • आता तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करू शकता.

MBA/MMS admission साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचे किमान पदवी पर्यंतचे शिक्षण झालेले असावे. त्यामध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत. आरक्षित वर्गासाठी गुणांची ही मर्यादा 45% आवश्यक आहे. सीईटी ची ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. मागील वर्षी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडला होता.