महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर 15 डिसेंबरला नागपुरात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या नव्या मंत्रिमंडळामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) अनेक नवे चेहरे आहेत. त्यामुळे चर्चेत असूनही मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अनेक बड्या नेत्यांची आता चर्चा सुरू झाली आहे. काही नेते मंडळींनी आज थेट नाराजी बोलून दाखवली आहे तर काही काहींनी राजीनामा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष आणि अन्य साथीदार पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या पाहता नाराज झालेले देखील मोठ्या संख्येत आहेत. शिवसेना, भाजपा आणि एनसीपी मध्ये अशा तिन्ही पक्षात नाराज आहेत. यामध्ये एनसीपी च्या छगन भुजबळ, शिवसेनेच्या विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे.
मंत्रिपदापासून दूर राहिलेले चर्चेतील बडे नेते
छगन भुजबळ
रवी राणा
दीपक केसरकर
तानाजी सावंत
प्रकाश सुर्वे
विजय शिवतारे
सुधीर मुनगंटीवार
रामदास आठवले
नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना नाराज असल्याचं स्पष्ट म्हणाले आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ कधी संपले नाही असे म्हटले आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Nagpur, UP: On being asked about several senior leaders not being included in the Maharashtra cabinet, NCP leader Chhagan Bhujbal says, "Who to include in the cabinet is the decision of the party leaders. They (party leaders) told us that senior leaders were not included to give… https://t.co/sGdvznYV9O pic.twitter.com/dEZvJwLkIk
— ANI (@ANI) December 16, 2024
शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रवी राणा हे नागपूर मधील विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. मात्र रवी राणा कालच नागपूरवरून अमरावतीला परतले आहेत. शिवसेनेचे तानाजी सावंत देखील काल संध्याकाळीच पुण्याला परतले आहेत. तर विजय शिवतारेंनी मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. असं ते म्हणाले आहेत.
मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय पक्षाने त्यांचा काही विचार करूनच मंत्रिमंडळापासून दूर केल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; जाणून घ्या कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी .
दरम्यान अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी काम करणार्यांनाच संधी मिळेल. सध्या महायुतीमध्ये अडीज अडीज वर्षांसाठी मंंत्रिपदं दिली जात आहेत. भविष्यात याच्या माध्यमातून अनेकांना संधी दिली जाईल आणि काहींना मंत्री आणि मंडळांची अध्यक्षपदं देऊन ही नाराजी दूर केली जाईल असं म्हटलं जात आहे.