Maharashtra Cabinet Expansion: अब्दुल सत्तार ते  राधाकृष्ण विखे पाटील शिंदे- फडणवीस सरकार मध्ये हे 18 जण आज होणार शपथबद्ध; पहा यादी
CM Shinde | ANI

शिंदे-फडणवीस सरकार मध्ये आज पहिल्या टप्प्याचा (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी राजभवन सज्ज झाले आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू होत आहे. दरम्यान या पहिल्या टप्प्यातील शपथविधी सोहळ्यामध्ये अपक्ष आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याचं समोर आलेल्या यादी मध्ये दिसत आहे. दरम्यान शिंदे गटामधून ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, आमदार दादा भुसे, उदय सामंत यांचा समावेश आहे. टीईटी घोटाळ्यामध्ये कालपसून चर्चेत असलेल्या अब्दुल सत्तार यांचा देखील आजच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी असणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड देखील नव्या मंत्रिमंडळात सहभागी असणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Cabinet Expansion Live Streaming On Abp Majha: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एबीपी माझा वर इथे पहा लाईव्ह! 

शिंदे-फडणवीस सरकार मधील पहिल्या टप्प्यात कोण घेणार मंत्रिपदाची शपथ 

शंभुराजे देसाई (शिंदे गट)

अब्दुल सत्तार (शिंदे गट)

रविंद्र चव्हाण (भाजपा)

अतुल सावे (भाजपा)

तानाजी सावंत (शिंदे गट)

राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)

विजयकुमार गावित (भाजपा)

गुलाबराव पाटील (शिंदे गट)

दादा भुसे (शिंदे गट)

मंगल प्रभात लोढा (भाजपा)

चंद्रकांत पाटील (भाजपा)

संजय राठोड (शिंदे गट)

उदय सामंत (शिंदे गट)

सुरेश खाडे (भाजपा)

सुधीर मुनगंटीवार (भाजपा)

दीपक केसरकर (शिंदे गट)

संदिपान भुमरे (शिंदे गट)

गिरीश महाजन (भाजपा)

राजभवनावरील शपथविधी सोहळ्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते. सोबतच केंद्रीय मंत्री भागवत कर्‍हाड, भाजपा नेते हजर होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून दिवशी शपथबद्ध झाले होते. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होत आहे.