मीरा रोडच्या नया नगरमध्ये श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांचे बेकायदा बांधकाम सरकारने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले आहे. बुलडोझर चालवल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. नया नगरमध्ये गोंधळ झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तेथील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवला जात आहे. (हेही वाचा - Mira Road Crime: मीरा रोड हाणामारी प्रकरणी 13 जणांना अटक; कठोर कारवाई करण्याचे सरकारचे निर्देश)
पाहा पोस्ट -
#MiraRoad #Mumbai pic.twitter.com/R0bDVTuou2
— NDTV (@ndtv) January 23, 2024
पाहा व्हिडिओ -
Haidry chowk pe bulldozer karwayi chalu#Mumbai #miraroad pic.twitter.com/hVKMOqPcwc
— SR - Oppressed (@RupaniGarcon) January 23, 2024
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण:
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेकाच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री काढण्यात आलेल्या बाइक रॅलीदरम्यान दोन गट समोरासमोर आले. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेक झाली. त्यानंतर परिसरात तणाव वाढला. आता बेकायदा बांधकामांवर कारवाई करत सरकारने मंगळवारी त्यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सध्या परिसरात सर्व काही सामान्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.