Maharashtra Budget 2021-22: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे महत्वाचे निर्णय
Deputy CM Ajit Pawar (Photo Credits-ANI)

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशानाला (Maharashtra Budget 2021-22) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यंदाचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडत आहेत. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रालाही कोरोनामुळे अनेक संकटाला सामोरे जावा लागत आहे. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर अधिक भर देण्यात आले आहे. तसेच कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. तसेच नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहेत. एवढेच नव्हेतर संसर्गजन्य रोगाचे प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणी येथे मेडिकल कॉलेज उभारले जाणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. कोरोना महामारी अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून वैद्यकीय सुविधा वाढवण्यात येत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Maharashtra Budget 2021-22 Live: पुण्याजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार- अजित पवार

महाराष्ट्रातील 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी देणार. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. आरोग्य विभागास यंदा 2 हजार 900 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर, वैद्यकीय शिक्षण विभागास 1 हजार 527 कोटी देणार आहेत, असेही अजित पवार विधानसभेत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.