Mansukh Hiren Death Case मध्ये पोलिस ऑफिसर  Sachin Vaze यांच्या अटकेच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक
CM Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

महाराष्ट्रामध्ये मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी आज सभागृहामध्ये पुन्हा गोंधळ पहायला मिळाला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे (Police Officer Sachin Vaze ) यांच्यावर गंभीर आरोप करत मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान यावरूनच गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं या मागणीवरून विधानसभेत गदारोळ पहायला मिळाला. सचिन वझे यांच्या अटकेची मागणी झाल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जमले आहेत. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आता सरकारकडून रणनिती बनवली जात आहे.

दुसरीकडे विरोधक मनसुख हिरेन प्रकरणावरून तापले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली आहे. यामध्ये त्यांनी सखोल चौकशी मागणी करत सचिन वझेंच्या अटकेसाठी देखील आग्रही भूमिका घेतली आहे. नक्की वाचा: Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांना अटक करा- देवेंद्र फडणवीस.

ANI Tweet

दरम्यान कालच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीस करेल आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या गाडीत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या प्रकरणी एनआयए तपास करेल असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये काल अनिल देशमुख यांनी विधानसभेत माहिती देताना मनसुख हिरेन यांची हत्या झाली असल्याचा संशय त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी व्यक्त केल्यामुळे अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी ३०२, २०१, १२० ब अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएसमार्फत सुरु असून तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. असे म्हटले आहे.