अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पहिल्यांदा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला आहे. या बजेटची सुरूवात त्यांनी जगतगुरू संत तुकाराम यांना आदरांजली अर्पण करत केली आहे. दरम्यान त्यांचे बजेट शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयांवर अवलंबून असल्याचं नमूद केले आहे. या बजेट मध्ये त्यांनी शिवभक्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्या (10 मार्च) साजरी केल्या जाणार्या तिथीनुसार शिवजयंती आणि यंदा शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाचं औचित्य साधून त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मध्ये केलेल्या घोषणेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची राज्य सरकारकडून तरतूद केली जाणार आहे. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान साठी 50 कोटींची तरतूद जाहीर केली जाणार आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या 2 ते 9 जून 2023 या काळात शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Maharashtra Budget 2023: 'लेक लाडकी' योजना ते आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ; पहा महिलांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा .
देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या बजेट मध्ये राज्यातील इंफ्रास्ट्रक्चर, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.