Maharashtra Budget 2021-22: 3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना 0% व्याजाने कर्ज; पहा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
Income of farmers | (Photo courtesy: Archived, Edited Images)

महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडला आहे. यामध्ये अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच कोरोना संकटाचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडल्याचं म्हटलं आहे. परंतू भारतामध्ये कृषी क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला काहीसा आधार मिळाल्याचं म्हटलं आहे. मागील वर्ष भरात कृषी क्षेत्रामध्ये 11% वाढ झाल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांप्रती आपलं उत्तरदायित्त्व म्हणून त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या यंदाच्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2021-22 मध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. Maharashtra Budget 2021-22 Live Streaming: विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात; DD Sahyari वर इथे पहा थेट प्रक्षेपण.

  • अर्थमंत्री अजित पवार यांनी आज कृषी क्षेत्रासाठी केलेल्या सर्वात मोठ्या घोषणेमधील एक म्हणजे 3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना 0% व्याजाने कर्ज दिले जाणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 200 कोटी रूपये दरवर्षी देण्यात येतील. यामुळं शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल.
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रूपयांची योजना आहे.
  • महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 19929 कोटी रूपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.
  • पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
  • कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1,500 कोटींचा महावितरणला निधी, विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी दिले जाणार आहेत.

दरम्यान आज अर्थसंकल्पामध्ये जलसंपदा विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद, पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी 3,700 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.