SSC Result 2019 (Photo Credits: File Photo)

MSBSHSE 10th Std Results 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा निकाल 77.10% इतका लागला आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निकाल पाहण्यासाठी इतर तीन वेबसाईटचीही सोय करण्यात आली आहे.  Maharashtra Board SSC Results 2019: दहावीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर,गुणांच्या आकडेवारीत लातूर मधील 16 विद्यार्थ्यांची 100 टक्के कामगिरी

 

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:

exametc.com

examresults.net

indiaresults.com

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:

# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

# Latest Notification section खालील MAH SSC 2019 Result या लिंकवर क्लिक करा.

# रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.

# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.

# निकाल स्क्रिनवर दिसेल.

# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.

SMS च्या माध्यमातून निकाल कसा पहाल?

एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी MHSSCand लिहून हा  शॉर्टकोड 57766 वर पाठवा. (महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; अ‍ॅडमिशन मध्ये आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी तयार ठेवा 'ही' सरकारी कागदपत्रं!)

यंदा दहावीच्या परीक्षेत 16 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाही दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 82.82% लागला आहे तर मुलांचा निकाल 72.18% लागला आहे.