महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) कडून आज (27 मे) दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक विषयात किमान 35% गुण असल्यास उत्तीर्ण म्हणून शेरा दिला जातो. आज ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका विद्यार्थ्यांना काही दिवसांनी शाळेमध्ये दिली जाणार आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. (हेही वाचा - Maharashtra Board SSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असे पहा गुण)
पाहा पोस्ट -
📢महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 27, 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून एकूण 16 हजार 140 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे. महानगरपालिकेच्या 71 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 63 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
कुलाबा महानगरपालिका माध्यमिक शाळेतील कुमार आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने 97.40 टक्के गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. निकालामध्ये दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेतली गेली असली तरीही निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी द्वारा जाहीर करण्यात आला आहे.