Maharashtra Board SSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असे पहा गुण
Result 2024 | file image

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) कडून आज (27 मे) दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल आता results.digilocker.gov.in, mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org वर पाहता येणार आहेत. दरम्यान यंदा दहावीचा निकाल 95.81% लागला आहे. मुलींनी या निकालात बाजी मारली असून कोकण विभागात सर्वाधिक 99% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता या निकालाच्या आधारे 11वी प्रवेशाची तयारी सुरू केली जाणार आहे. तर अपेक्षित निकाल न लागलेल्या विद्यार्थ्यांनी हिरमुसून न जाण्याचं आवाहन बोर्डाने केले आहे. जुलै महिन्यात पुन्हा श्रेणीसुधार परीक्षेचा पर्याय देण्यात आला आहे.  Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल DigiLocker कसा पहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप ! 

कसा पहा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा ऑनलाईन निकाल ?

  • दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 10वी निकालाचा पर्याय निवडा.
  • आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
  • त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  • तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  • तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

प्रत्येक विषयात किमान 35% गुण असल्यास उत्तीर्ण म्हणून शेरा दिला जातो. आज ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका विद्यार्थ्यांना काही दिवसांनी शाळेमध्ये दिली जाणार आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. आजच्या निकालामध्ये दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेतली गेली असली तरीही निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी द्वारा जाहीर करण्यात आला आहे.