Maharashtra Board SSC, HSC Results 2020: 12वी आणि 10वी चे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल यंदा कोरोना संकटामुळे जुलै महिन्यात लागणार?
प्रातिनिधीक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

Class 10th 12th Maharashtra Board Results 2020:  महाराष्ट्रामध्ये यावर्षी जून माहिन्याचा मध्य आला तरीही बोर्डाच्या 10वी (SSC), 12वीच्या (HSC) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख समजलेली नाही. दरम्यान काही दिवसांपासून सोशल मीडियात यंदा बोर्डाचे निकाल 10 जून पर्यंत लागू शकतात अशी चर्चा रंगली होती मात्र अद्याप निकाल लावण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बोर्डाकडून अधिकृत तारीख (Board Exam Results Date) जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या महाराष्ट्रभर कोरोना व्हायरसचं लोण पसरलं आहे. त्यामुळे परीक्षा वेळेत उरकल्या असल्या तरीही बोर्डाच्या 9 ही विभागातून उत्तरपत्रिका तपासून एकत्र निकाल लावण्याचं आव्हान शिक्षण मंडळासमोर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेल्या 10वी, 12वी च्या तारखांच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका लवकरच शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर तारखा जाहीर केल्या जातील असं सांगण्यात आलं आहे. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

दरम्यान यंदा महाराष्ट्र राज्यात यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा दिली आहे. राज्यात कोरोना संकटामध्येही या लाखो विद्यार्थ्यांचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोनमध्ये रहदारीवर बंधनं असल्याने अजूनही काही उत्तरपत्रिका तपासण्याचं, त्याचे निकाल लावण्याचं काम रेंगाळलं आहे. मात्र बीबीसी मराठी शी बोलताना, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12वीच्या 50% उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे तर उरलेल्या 50% उत्तरपत्रिका पुढील 15 दिवसांत बोर्डाकडे देण्यात येतील. त्यानंतर बोर्डाला निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या गणितानुसार महाराष्ट्रात बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.  10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC, HSC प्रमाणेच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे यंदाचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात?

आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहता पहिल्यांदा 12वीचे आणि त्यानंतर आठवड्याभराच्या कालावधीने 10वीचे निकाल जाहीर केले जातात. सध्या कोरोनाची दहशत पाहता महाराष्ट्रात 10वी आणि 12वीचे बोर्डाचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत हाती येण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2020-21 यंदा कसं सुरू करायचं? हा प्रश्नदेखील सरकारसमोर आहे. दरम्यान जुलै महिन्यात देशातील, राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्याचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राज्यात आता काही शाळांमध्ये ऑनलाईन माध्यमातून काही वर्गांच्या शिकवणीला सुरूवात झाली आहे.