Maharashtra Board HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 23 जुलै नंतर; अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जारी
Exam Result | (File Image)

भारतामध्ये कोरोना वायरसचा कहर पाहता यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी,बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. आता शिक्षण मंडळा कडून या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने 10वी, 12वीचे निकाल लावले जाणार असल्याने शिक्षण विभागाकडून त्याच्या सूचनांचे परिपत्रक जाहीर केल आहे. काल (5 जुलै) दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याबद्दल एक ट्वीट करत माहिती दिली आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे परिपत्रक जारी झाले आहे. Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता.

12वीच्या निकालासाठी 7 जुलै 2021 पासून अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षक सुरू करणार आहेत तर 23 जुलै पर्यंत शाळा आणि ज्युनियर कॉलेजला हे काम पूर्ण करून निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचा आहे. बारावीच्या निकालासाठी यंदा 10वी,11वी आणि 12वी चे गुण 30:30:40 या फॉर्म्युलाने ग्राह्य धरले जाणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra HSC Exam 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वपूर्ण माहिती.

वर्षा गायकवाड ट्वीट

  • उच्च माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल समितीकडे सादर करणे हे काम 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान शिक्षक करतील.
  • विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मध्ये 14 जुलै ते 21 जुलै दरम्यान भरले जातील.
  • विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान जमा केले जातील.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यांना 31 जुलै पर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. अद्यापही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली आहे. पण लवकरच कोरोनामुक्त गावांमध्ये, भागांमध्ये 8-12 वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा सरकार विचार करणार आहे.