देवेंद्र फडणवीस यांच्या 'महा जनादेश' यात्रेसाठी अमित शहा, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र भाजप कडून आमंत्रण
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर ऑगस्ट महिन्यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महा जनादेश यात्रा (Maha Janadesh Yatra) सुरू करणात आहेत. या यात्रेदरम्यान फडणवीस महाराष्ट्रभर फिरणार आहेत. सामान्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही महा जनादेश यात्रा म्हणजे भाजपाचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल असल्याचे समजले जात आहे. या महाजनादेश यात्रेच्या सुरूवातीला आणि समारोपाला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असावी यासाठी महाराष्ट्र भाजपाकडून विनंती करण्यात आली आहे.

1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. ही यात्रा काही खाजगी नसून यामध्ये कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होतील अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

ANI Tweet

नुकतेच शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा नुकताच संपला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन लवकरच दुसर्‍या टप्प्याला सुरूवात करणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूका असतील. त्यासाठी शिवसेना - भाजपाची युती होणार आहे.