महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election Results) लागल्यानंतर आता महायुतीच्या सत्तेमध्ये मुख्यमंत्री कोणा होणार? कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची चर्चा सुरू असताना आता महायुतीच्या सरकारचं पहिलं अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान नागपूरात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत महायुतीला दमदार यश मिळाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. मुंबई मध्ये आझाद मैदानावर (Azad Maidan) हा शपथविधी होणार आहे. नव्या विधानसभेत विरोधीपक्ष नेमण्याइतक्या संख्याबळ विरोधकांना गाठता न आल्याने विरोधी पक्ष नेत्या शिवाय कामाला सुरूवात होणार आहे.
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन हे नागपूर मध्ये घेतलं जातं. आता विधानसभा निवडणूकांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होणार आहे. सध्या नागपूरातील विधिमंडळाचं काम सुरू असल्याने आणि नव्या सरकार नंतर तयारीला वेळही कमी असल्याने आमदारांची डिजिटल माध्यमात खातिरदारी ठेवली जाणार आहे. विधान परिषदेच्या आमदारांना डिजिटल आसनव्यवस्था देण्यात आली आहे.
यंदा प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे. Maharashtra CM: कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? अजित पवारांनी दिली माहिती .
लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढीची शक्यता
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामध्ये 1500 वरून 2100 रूपये दिले जातील असा अंदाज आहे. महायुतीकडून त्यांच्या जाहीरनाम्यात नवं सरकार आल्यास मानधनात वाढ केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या अधिवेशनात त्याच्या घोषणेचा अंदाज आहे.