सुनील अरोरा (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात होणारी आगमी विधानसभेसाठी (Assembly Elections) राजकीय पक्षांत जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. परंतु अद्याप निवडणूकाच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. तरीही राजकीय पक्षात निवडणूकीबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा (Sunil Arora) यांनी आज मुंबईत (Mumbai) झालेल्या एका पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. तर विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. परंतु बॅलेटपेपर आता इतिहासजमा झाले असून यंदाची विधानसभा निवडणूक ईव्हीएमवरच (EVM) घेण्यात येणार असल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुनील अरोरा यांनी आगामी विधानसभा निवडणूकीबाबत काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामधील मुख्य मुद्दा म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक बॅलेटपेपरवर न घेता ईव्हीएमवरच होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. परंतु ईव्हीएम सोबत कोणताही छेडछाड होणार नसल्याचे ही आरोरा यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा सह 5 जणांना NCP कडून उमेदावारी जाहीर; शरद पवार यांच्याकडून बीड मध्ये घोषणा)

तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीचा मुद्दा ही अरोरा यांनी पत्रकार परिषदेत मांडला. त्याचसोबत काही राजकीय पक्षांनी दिवाळीनंतर आगामी विधानसभा निवडणूक घ्याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.