महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. तत्पूर्वी विधानसभा निवडणूकीच्या कामासाठी शिक्षकांना ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या परिक्षांवर याचा परिणामासह दिवाळी सुट्टी बाबत ही प्रश्न उभा राहिला आहे. तर 22 ऑक्टोंबर पर्यंत शिक्षक निवडणूकीच्या कामात वस्त असणार आहेत. यंदा शिक्षकांना देण्यात येणारी सुट्टी येत्या 23 किंवा 24 ऑक्टोंबर नंतर देण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.
निवडणूकीच्या कामामुळे शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग होणार नाही असे म्हटले जात आहे. यामुळेच दिवाळीच्या सुट्टीच्या तारखा थोड्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक उपसंचालकांकडे करण्यात आली आहे. तर 12 एप्रिल 2019 च्या शिक्षण संचालनालयाच्या पत्रामध्ये 21 ऑक्टोंबर पासून शाळेला सुट्टी देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रात निवडणूकासुद्धा याच दिवशी असल्याचे शिक्षक पुढील दोन दिवस त्याच कामात व्यस्त राहिल्याने सुट्टीचा काय फायदा असा सवाल शिक्षकांकडून करण्यात येत आहे.(मुंबई: निवडणूक आयोगाकडून धारावी विधानसभा मतदारसंघात 8.17 लाख रूपयांची रोकड जप्त)
काही शाळांकडून देण्यात येणाऱ्या 76 सुट्ट्यांपैकी काही कारणास्तव सुट्टा कापून घेतल्या जात असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी म्हटले आहे. तर येत्या 24 तारखेला निवडणूकीचा निकाल लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये कोणाचे सरकार पुन्हा विधानसभेत बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीबाबत आता काय निर्णय देण्यात येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.