महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: धुळे जिल्ह्यातील साक्री ते शिरापूर मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
Maharashtra assembly elections 2019 (Photo Credit: File Photo)

धुळे जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ येतात. साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, शिरापूर अशी या मतदारसंघांची नावे आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

 

साक्री मतदारसंघ क्रमांक- 5

साक्री मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे डॉ डी एस अहीरे यांनी सर्व प्रथम धुळे लोकसभेसाठी उमेदवारी करीत विजय मिळवला होता. त्यानंतर हा विधानसभा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा त्यांना 2004 मधे विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत काँग्रेसच्या हातातुन गेलेला हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला. यानंतर पुन्हा 2014 मध्ये पक्षाने अहीरे यांना संधी दिल्यानंतर ते पुन्हा विजयी झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील साक्री मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- मोहन सुर्यवंशी (भारत), डी. एस. आहिरे (काँग्रेस)

धुळे ग्रामीण विधानसभा क्रमांक- 6

धुळे ग्रामीण मतदार संघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु,  विधानसभा निवडणूक 2009 मध्ये मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेना विजय मिळवला होता. विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस पक्षाचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचे मनोहर भदाणे यांना पराभूत करुन पुन्हा या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने त्यांचा झेंडा फडकावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील धुळे मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- ज्ञानज्योती बदाणे (भाजप), कुणाल पाटील (काँग्रेस)

धुळे शहर मतदारसंघ क्रमांक- 7

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजप- सेना यांच्यात युती नव्हती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडी न झाल्याने सर्व पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांचा 57 हजार 780 मतांनी विजय झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे विरुद्ध उभे होते. कदमबांडे यांना 44 हजार 852 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील धुळे शहर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- हिलाल माळी (शिवसेना), संदीप बेंडसे (राष्ट्रवादी), प्राची कुलकर्णी (मनसे)

शिंदखेडा मतदार संघ क्रमांक- 8

या मतदार संघात पुलोद, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने 2009 पुर्वी वर्चस्व होते. या मतदार संघात पाटील व राजपुत मतदारांची निर्णायक संख्या आहे. दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा यासारखी मोजकी गावे सोडली तर, हा भाग ग्रामीण शेती व्यवसाय करणारा भाग आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत रावल यांना 92 हजार 794 मत मिळाले होते तर, 50 हजार 636 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील शिंदखेडा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- जयकुमार रावल (भाजप), नरेंद्र धर्मा पाटील (मनसे)

शिरापूर मतदारसंघ क्रमांक- 9

धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा विधानसभा मतदार संघ 2009 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र 2009 पासून हा मतदार संघ राखीव झाला. विधानसभा निवडणूक 2014 साली राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कांशीराम यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला होता. पावरा यांना 98 हजार 114 मत मिळाली होती तर, ठाकूर यांना 72 हजार 913 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील शिंदखेडा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- काशीराम पावरा (भाजप), रंजीत पावरा (काँग्रेस)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.