महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाने झळकवले विजयाचे पोस्टर
भाजप आणि राष्ट्रवादी (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात 21 तारखेला 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. तर आज या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार असून कोणाची सत्ता येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र तरीही निवडणूकीच्या निकालापूर्वी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) पक्षाकडून विजयाचे पोस्टर मुंबई-पुणे मध्ये झळकवण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या निकालासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षांच्या नेतेमंडळीपासून ते सामान्य व्यक्तीचे लक्ष मतदानाच्या आकड्याकडे लागून राहिले आहे. परंतु एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचा वियज होईल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, जेपी नड्डा यांच्या फोटोसह विजयाचे पोस्टर झळकावले आहे. या पोस्टरवर पुन्हा एकदा आपले सकार असे लिहिण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा त्यांच्या पक्षाचा विजय होईल अशी आशा बाळगत पोस्टर झळकावले आहेत. पुण्यातील बारामती येथे अजित पवार यांच्या विजयाचे पोस्टर दिसून येत आहेत.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी भाजपचा उत्साह शिगेला, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी 5 हजार लाडूंचे वाटप)

दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.