महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: कळवा- मुंब्रा मतदारसंघातून 'आप'चे उमेदवार Abu Altamash Faizi यांना 'AIMIM'चा पाठिंबा - इम्तियाज जलील
MIM MLA Imtiyaz Jaleel | (Archived photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Mahrashtra Assembly Elections 2019) तोंडावर सर्वत्र प्रचारसभांचे वारे वाहत आहेत. एखाद्या ठिकाणी अमूक एक पक्षाचा उमेदवार नसला तरी मित्रपक्षाला पाठिंबा देण्याची रणनीती अवलंबली जात आहे. असाच एक प्रकार कळवा-मुंब्रा (Kalwa-Mumbra) मतदारसंघातून देखील समोर येत आहे. या ठिकाणी आम आदमी पक्षाचे (AAP) अधिकृत उमेदवार डॉ. अबू अल्तमाश फैझी (Dr. Abu Altamash Faizi) यांना पाठिंबा देण्यासाठी AIMIM पक्ष धावून आला आहे. AIMIM नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी माहिती देत स्वतःच्या अधिकृत उमेवाराने ऐन वेळेस माघार घेतल्याने फैझी यांना समर्थन दर्शवत असल्याचे स्पष्ट केले आहे. फैझी हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिवसेनेच्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्या विरुद्ध लढणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, AIMIM तर्फे कळवा मुंब्रा मतदारसंघातून बर्कतुल्ला शेख यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र शेख यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षाकडे काहीही पर्याय उरला नव्हता अशातच फैझी यांनी AIMIM कडे पाठिंब्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत जलील यांनी "आम्ही एका शिक्षित आणि पात्र उमेदवाराला निवडून येण्यास मदत करणार आहोत" असे सांगत फैझी यांना समर्थन देण्याचे ठरवले आहे. हा निर्णय घेण्याआधी आम्ही पार्टी अध्यक्ष असरुद्दिन ओवेसी यांची संमती घेत फैझी यांच्या प्रोफाईलची पडताळणी केल्याचे सुद्धा सांगितले.

'आम आदमी पक्ष' कडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर

इम्तियाझ जलील फेसबुक पोस्ट

दरम्यान, यंदा प्रथमच आम आदमी पार्टीदेखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणूकीमध्ये 50 -55 जागांवर निवडणूक लढणार आहे.