राज ठाकरे यांना मनसे दिलासा; कल्याण ग्रामीण येथून प्रमोद राजू रतन पाटील, सिंदखेडा येथून नरेंद्र धर्मा पाटील आघाडीवर
Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

एक्झिट पोल्सअंदाजातही शून्य जागा मिळालेल्या आणि राज्यभरात उत्सुकतेचा विषय ठरलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा उमेदार प्रमोद राजू रतन पाटील यांना आघाडी मिळताना दिसत आहे.

राज्यभरातील विविध मतदारसंघातील प्राथमिक कल हाती येत आहेत. या कलामध्ये भाजप शंभरीपार आघाडी, शिवसेना साठीपार, काँग्रेस तीशीपार तर राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहेत. तर, मनसेह इतर 8 जागांवर आघाडीवर आहेत.  (हेही वाचा, परळी: धनंजय मुंडे 1 हजार मतांनी आघाडीवर; भाजपसह पंकजा मुंडे यांना मोठा धक्का)
राज्यभरातून हाती येणारे कल पाहता मनसेसाठी ही दिलासादायक बातमी आहे. आज सकाळी आठ वाजलेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 288 मतदारसंघासाठी ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी झाली. त्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची मोजणी पार पडत आहे. सर्वांनाच विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत उत्सुकता आहे. लवकरच ही आकडेवारी आपल्या हाती येईल.